Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळ येथील अभाविप प्रदेश कार्यक्रमास डॉ. केतकी पाटील यांनी दिली भेट

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देवगिरी प्रांताचा कार्यक्रम भुसावल येथील बियाणी मिलीट्री स्कूल येथे 11 ते 14 जून दरम्यान आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी गोदावरी फौंडेशन संचालिका तथा भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ केतकी ताई पाटील यांनी शुक्रवार दिनांक १४ जून रोजी भेट दिली. यावेळी तेथील प्रदर्शनीची पाहणी करून संवाद साधला.

या प्रसंगी पश्चिम क्षेत्र क्षेत्रीय संघटन मंत्री श्री.देवदत्त जोशी, देवगिरी प्रांत संघटनमंत्री सिध्देश्वर लटपटे, प्रदेश अध्यक्ष श्री.सचिन कंदले, ललित सोनार सह संयोजक मेडीव्हिजन, भुसावळ जिल्हाप्रमुख गिरीश कुलकर्णी, निकिता कांबळे, अस्मिता शेटे, गणेश मुसळे, पियुष चिंचकर यांच्यासह अभाविप, मेडिव्हीजन चे पदाधिकारी उपस्थित होते. या अभ्यास वर्गा मध्ये नंदुरबार, धुळे, भुसावळ, छत्रपती संभाजी नगर महानगर व ग्रामीण, जालना,लातूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड महानगर व किनवट चे विद्यार्थी आणि पदाधिकारी सहभागी झाले. यावेळी येथील प्रदर्शनीच्या माध्यमातून परिषदेचे कार्य जाणून घेऊन अभाविप सह मेडीव्हीजन चे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या सोबत चर्चा केली.

Exit mobile version