बळीराम पेठेत ऑईल गळतीमुळे डी.पी.ने घेतला पेट

जळगाव प्रतिनिधी । शहरातील बळीराम पेठेतील एका वीज डीपीला रविवारी दुपारी ४ वाजता अचानक आग लागली. नागरिकांनी धाव घेवून वेळीच आग विझविल्याने डीपीचे नुकसान टळले. मात्र, यामुळे काही वेळ वीज पुरवठा खंडित झाला होता.

बळीराम पेठेतील डॉ. दशपूत्रे यांच्या दवाखान्यावर वीज डीपी आहे. या डीपीला रविवारी दुपारी ४ वाजता ऑईल गळतीमुळे अचानक आग लागली. क्षणातचं आगीने रौद्ररूप धारण केले होते. हा प्रकार परिसरातील रितेश भाटीया, विजय अग्रवाल, योगेश पाटील, अजय बारसे, रवी दशपूत्रे, राहूल घारपूरे यांना दिसला. त्यांनी आगीच ठिकाणी धाव घेवून वाळू-मातीने आग विझविण्‍याचा प्रयत्न केला. काही वेळातचं घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब सुध्दा दाखल झाले होते. अग्निशमन बंबाच्या कर्मचाऱ्यांनी वाळू-मातीच्या मदतीने आग विझविली.

डीपीला आग लागल्यामुळे बळीराम पेठ परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. याबाबत रहिवाश्यांनी महाविरतण संपर्क साधल्यानंतर काही क्षणातचं राकेश वंजारी, सागर सदावर्ते, सचिन सपकाळे, धनश्याम सपके, सुनील सपकाळे व मनोज जिचकर आदी महावितरण कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी दुरूस्ती करून वीज पुरवठा सुरळीत केला.

 

Protected Content