Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजप खासदाराचा संशयास्पद मृत्यू

नवी दिल्ली । भाजपचे मंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार रामस्वरूप शर्मा यांचा मृतदेह हा त्यांच्या निवासस्थानी लटकलेल्या अवस्थेत आढळून आला असून त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातली भाजपचे खासदार रामस्वरुप शर्मा यांचा आज सकाळी त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. रामस्वरूप शर्मा हे दोनदा लोकसभेवर निवडून आले होते. आज सकाळी सातच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलीस अधिकारी जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा शर्मा यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास करत आहे.

Exit mobile version