Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डबल मर्डर- आमदार चंद्रकांत पाटील यांची रोझोदा गावाला भेट

 

सावदा ता रावेर प्रतीनिधी- रोझोदा येथे वयोवृध्द पति पत्नीचा गळा चिरुन धारदार शस्त्राने निघृण हत्या केल्याची दि.९ सप्टेंबर मध्यरात्री घटना घडली. आ. चंद्रकांत पाटील यांनी रोझोदा गावाला भेट देऊन मृत व्यक्तीच्या परिवाराचे सांत्वन केले

रावेर तालुक्यातील रोझोदा येथील सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी ओंकार पांडूरंग भारंबे [वय ९० ]. सुमनबाई ओंकार भारंबे [८४ ] या दोघ पति पत्नीचा अज्ञात व्यक्तिंकडूनधारदार शस्त्राने गळा चिरुन निघृण हत्या करण्यात आली.

आमदार चंद्रकांत पाटील यांनी रोझोदा गावाला भेट देऊन सावदा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना सुचना देत आरोपींना तात्काळ जेरबंद करून त्यांच्यावर कारवाई करा व मृत व्यक्तीच्या परिवाराचे सांत्वन केले

Exit mobile version