Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोविडबाबत चिंता नको : आयआयटीच्या तज्ज्ञांचा दिलासा

कानपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे कोरोनाच्या नव्या लाटेची भिती निर्माण झाली असतांना आयआयटी कानपूरच्या तज्ज्ञांनी मात्र याला घाबरण्याचे कारण नसल्याचे नमूद केले आहे.

चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला असून यामुळे भारतात देखील निर्बंध लागणार की काय ? याबाबत सर्वांच्या मनामध्ये शंका उपस्थित होऊ लागली आहे. या पार्श्‍वभूमिवर, आयआयटी कानपूरच्या तज्ज्ञांनी मात्र दिलासा देणारी माहिती सांगितली आहे. आयआयटीमधील प्राध्यापक मणींद्र अग्रवाल यांच्या मते, भारतात ९८ टक्के लोकांची कोव्हिडविरुद्धची नैसर्गिक रोगप्रतिकारक क्षमता निर्माण झाली आहे. काही लोकांची रोगप्रतिकारक क्षमता कमकूवत असेल आणि एखादी छोटी किंवा मोठी लाट येईल. या शिवाय भारतात फार काही काळजी करण्यासारखे कारण नाही.

दरम्यान, कोरोनाच्या प्रतिकारासाठी सध्या बुस्टर डोस किंवा नव्या वर्षाच्या स्वागतासाठी होणार्‍या पार्ट्या, लग्न समारंभ यावर बंदी घालण्याची गरज नाही असेही त्यांनी सुचविले आहे.

Exit mobile version