राजीनामा देऊन पक्षाला वेठीस धरू नका : अभिषेक पाटलांचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी | आज राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी दिलेले राजीनामे मागे घ्यावेत असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अभिषेक पाटील यांनी केले आहे.

कालच अभिषेक पाटील यांची राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. यानंतर त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. याचे आज अतिशय संतप्त पडसाद उमटले. आज पक्षाच्या जिल्हा कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधून १२ आघाड्यांचे प्रमुख आणि कार्यकारण्यांनी आपल्या पदाचे राजीनामे देऊन अभिषेक पाटील यांना पाठींबा दिली.

यानंतर सायंकाळी अभिषेक पाटील यांनी आपल्या समर्थकांना राजीनामे मागे घेण्याचे आवाहन केले. या संदर्भात अभिषेक पाटील यांनी जारी केलेले पत्र खालीलप्रमाणे आहे. :- पक्षातील माझ्या मित्र मंडळी साठी, संकटाच्या किंवा वाईट काळात जो सोबत असतो तोच खरा मित्र व सहकारी असतो….आज आपण जळगाव शहरातील माझ्या सर्व सहकारण्यांनी जे पाऊल उचलले ते नक्कीच कौतुकास्पद आहे यात तिळमात्र शंखा नाही ..परंतु आपण सर्वांनी राजीनामे देऊन पक्षास वेठीस धरू नये त्या मुळे आपणांस विनंती की आपण राजीनामे माघे घ्यावे.या पुढे हा अभिषेक शांताराम पाटील आपणांस सर्वाना शब्द देऊ इच्छितो की जो पर्यंत माझा श्वास चालू राहील, असे देखील ते म्हणाले आहे.

 

Protected Content