Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सर्वच मागण्या घेऊन माझ्या कडे नका येऊ – गडकरींनी आमदार-खासदारांना सुनावलं..

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आमदार आणि खासदारांना चांगलेच सुनावले.

 

नितीन गडकरी यांनी बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्ग उभारले आहेत. त्यामुळे जे विषय राज्य सरकारकडे आहे ते विषय घेऊन आमदार, खासदार नितीन गडकरी यांच्याकडे जात आहे. यावर उपस्थित आमदार खासदारांना मिश्किल टोला लगावत नितीन गडकरी यांनी चांगलंच सुनावलं आहे.

 

जे विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत आहेत ते विषय घेऊन माझ्याकडे येऊ नका.. मी तुम्हाला सूट शिवून देऊ शकतो.. किमान टाय आणि अंडरपॅन्ट, बनियन तरी तुम्ही राज्य सरकारकडून मिळवा.. असा टोला नितीन गडकरी यांनी लगावला.. त्यानंतर सभा स्थळी एकच हशा पिकला होता..

Exit mobile version