Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डोणगाव ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्यावतीने राबविली स्वच्छता मोहीम

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील डोणगाव ग्रामपंचायतीच्यावतीने पावसाळा सुरु होण्यापूर्वीच गावात ग्रामस्थांकडून महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी जेसीबी मशीनच्या सहाय्याने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. 

तालुक्यातील डोणगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातुन पुढील महीन्यात आगमन होणाऱ्या वरूणराजाच्या पार्श्वभुमीवर पावसाळा सुरू होण्यापुर्वीच गावातील ग्रामस्थांना विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागेल या सुरक्षेच्या दृष्टीने युद्धपातळीवर पाणीपुरवठा करणा-या बोरींग व त्यांच्या आजुबाजुच्या परीसर तसेच गावातील महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी जेसीबी मशीनच्या सहाय्याने स्वच्छता मोहीम अंतर्गत साफसफाई करण्यात आली आहे. 

 

याशिवाय पावसाळ्यात गावातील नागरीकांना मुबलक व शुद्ध पाणी मिळावे व ग्रामस्थांचे आरोग्य निरोगी व उत्तम रहावे, यासाठी डोणगाव ग्रामपंचायतीमार्फत ही स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. यावेळी गावातील जेष्ठ नागरीक साहेबराव भाऊराव पाटील, भगवान रामचंन्द्र पाटील,  आसाम रायफलचे जवान योगेश सुरेश पाटील, भरत गुलाबराव पाटील, ग्रामपंचायत शिपाई ईश्वर निंबा पाटील, विलास अशोक कोळी, उपसरपंच मनोहर पाडुरंग भालेराव, शांताराम अरूण पाटील आदींसह राँयल फौजी योगेशभाऊ मित्र परीवारातील सदस्य उपस्थितीत प्रामुख्याने या ग्रामपंचायतच्या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.

Exit mobile version