Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आज मध्यरात्रीपासून घरगुती पाईप गॅस महागणार

मुंबई वृत्तसंस्था | कोरोनाच्या समस्येतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असलेल्या आणि आधीच इंधन दरवाढीचा सामना करत असलेल्या सामान्य जनतेला पुन्हा एकदा नव्या दरवाढीचा सामना करावा लागणार आहे. मुंबई आणि परिसरात सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे.

आज शनिवार, दि.८ जानेवारी २०२२ च्या मध्यरात्रीपासून ही नवी दरवाढ लागू होणार असून सुधारित दरानुसार सीएनजी प्रति किलो २.५० रुपयांनी, तर घरगुती पाईप गॅस (पीएनजी) १.५० रुपये प्रति युनिट महाग झाला आहे. आज शनिवार, दि.८ जानेवारी २०२२ च्या मध्यरात्रीपासून ही नवी दरवाढ लागू होणार आहे.

बाजारातील नैसर्गिक वायूच्या किमतीत मोठी वाढ झाल्यामुळे ‘एजीएल’च्या इनपुट गॅसच्या किमतीतही वाढ झाली असून त्यामुळे सीएनजी प्रति किलोमागे २.५० तर पीएनजी प्रति युनिट मागे १.५० रूपयांनी वाढवण्यात आला आहे. मुंबई आणि परिसरात या सुधारित दर वाढीनुसार सर्व करांसह सीएनजी आता ६६ रूपये प्रति किलो तर पीएनजी ३९.५० प्रति युनिट दराने मिळणार आहे. आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे हैराण झालेल्या सामान्य जनतेला या दर वाढीमुळे धक्का बसणार आहे.

Exit mobile version