Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

घरगुती गॅसचा काळाबाजार; दोन जणांवर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील बळीराम पेठ परिसरात घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकला. त्याठिकाणाहून हजारो रुपयांचा गॅस भरण्याचे साहित्य व सिलेंडर जप्त करण्यात आले असून याप्रकरणी दोन जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शहरातील बळीरामपेठ मधील दुर्गादेवी मंदिराच्या समोरील गल्लीसह गंगूबाई शाळेच्या भिंतीला लागून एका लोखंडी टपरीमध्ये घरगुती वापराच्या गॅस सिलंेडरमधून रिक्षांसह इतर वाहनांमध्ये गॅस भरुन काळाबाजार करणाऱ्या दोघांवर शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी छापा टाकला. त्याठिकाणाहून सुमारे ३६ हजारांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अन्वर नुरोद्दीन भिस्ती (वय ४६, रा. शाहूनगर) व फिरोज खान सलीम खान (वय २७, रा. काट्या फाईल नॅशनल जीमजवळ) या दोघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास किशोर निकुंभ हे करीत आहे.

Exit mobile version