Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुंबईतील केईएम रुग्णालयात डॉक्टरची आत्महत्या

dead ..........

मुंबई वृत्तसंस्था । मानसिक छळातून नायर रुग्णालयात निवासी डॉक्टरने केलेल्या आत्महत्येचे प्रकरण ताजे असतानाच आज (दि.16) केईएम रुग्णालयात २९ वर्षीय डॉक्टरने आत्महत्या केली आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, जयस्वाल असे आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरचे नाव आहे. विषारी इंजेक्शन घेऊन या डॉक्टरने स्वत:ला संपवले आहे. घटनास्थळी कुठलीही सुसाइड नोट मिळालेली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. देशमुख यांनी आत्महत्येच्या घटनेला दुजोरा दिला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version