Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ.उल्हास पाटील विधी महाविद्यालयात वृक्षारोपणाने जागतिक वसुंधरा दिन साजरा

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जागतिक पृथ्वी दिनाची सुरुवात १९७० मध्ये झाली. आजची पृथ्वीवरील वृक्षतोड, जंगलतोड व वाहनांची वाढती संख्या यामुळे पर्यावरणाचा समतोल वाढून, उष्णतेची लाट, पूर, दुष्काळजन्य परिस्थिती, इत्यादिच्या प्रमाणात विलक्षण वाढ झालेली आहे. पृथ्वीवरील प्रदूषित वातावरण कमी करण्यासाठी खारीचा वाटा म्हणून, डॉ.उल्हास पाटील विधी महाविद्यालयातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी (शैक्षणिक वर्ष २०२१-२२) एम.आय.डी.सी. परिसरातील कॉलेज कॅम्पस व आजूबाजूच्या परिसरात एकूण शंभर झाडे लावून जागतिक वसुंधरा दिन उत्साहात साजरा केला.

याप्रसंगी दरवर्षी १०० झाडे लावून संपूर्ण एमआयडीसी परिसर हिरवागार करण्याचा मानस व शपथ विद्यार्थ्यांनी घेतली. झाडे लावण्यासाठी गोदावरी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.व्हि.एच.पाटील यांनी झाडे देऊन सहकार्य केले. यावेळी विद्यार्थी विशाल राजपूत, संभाजी पाटील, अमोल जोशी, मंगेश लोहार, रामकृष्ण हिरे, सुनील चौधरी, कोमल करमचंदानी, अश्विनी लोहार, वैशाली कोराटे, गोकुळ पाटील, विश्वजीत जगताप, महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य सतीश गाडगे, महाविद्यालयाचे ग्रंथपाल मनीषा इंगळे तसेच शिक्षकेतर कर्मचारी प्रदीप महाजन व अमोल चौधरी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन झाडे लावली.

Exit mobile version