Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भारतीय संविधान धोक्यात,भाजपला मतदान करू नका ; ६०० कलाकारांचे आवाहन

shahmodi 1

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय संविधान धोक्यात आहे. त्यामुळे मतदान करा आणि भाजप व त्यांच्या मित्रपक्षांना सत्तेतून बाहेर हाकला, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड, अमोल पालेकर, नसिरुद्दीन शहांसह ६०० कलाकारांनी केले आहे. दरम्यान, या आधीही १०० हून अधिक सिनेकलावंतांनी भाजपला मतदान न करण्याचे आवाहन केले होते.

 

या सर्व कलाकारांनी १२ भाषांमध्ये एक पत्रक जारी करून हे आवाहन केले आहे. आर्टिस्ट यूनायटेड इंडियाच्या संकेतस्थळावर हे पत्र अपलोड करण्यात आले आहे. भाजपला मतदान करू नका, असे या पत्रात म्हटले आहे. या पत्रावर नसिरुद्दीन शहा यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, गिरीश कर्नाड, शांता गोखले, महेश एलकुंचवार, महेश दत्तानी, अरुंधती नाग, कीर्ती जैन, अभिषेक मुजूमदार, कोंकणा सेन-शर्मा, रत्ना पाठक-शहा, लिलेट दुबे, मीता वशिष्ठ, मकरंद देशपांडे, अुनराग कश्यप, एम. के. रैना आणि उषा गांगुली यांच्या सह्या आहेत.

 

सध्याची लोकसभा निवडणूक देशाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. आज गीत, नृत्य, हास्यही धोक्यात आहे. आपले आगळेवेगळे संविधानही धोक्यात आहे. ज्या ठिकाणी तर्क, चर्चा आणि असहमतींना वाव दिला जातो, अशा संस्था, यंत्रणांचा गळा घोटण्यात आला आहे, असे या पत्रात म्हटले आहे. कोणतीही लोकशाही प्रश्न, चर्चा आणि दक्ष विरोधी पक्षांशिवाय परिपूर्ण होऊच शकत नाही. मात्र सध्याच्या सरकारने या सर्व गोष्टी पायदळी तुडविल्या आहेत. त्यामुळेच सर्वांनी भाजपला सत्तेतून हाकलण्यासाठी मतदान करायला हवे. कट्टरता, घृणा आणि निष्ठुरतेला सत्तेतून घालवा, संविधान वाचवा, असे आवाहनही या पत्रातून करण्यात आलं आहे.

Exit mobile version