Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ईडीच्या कार्यालयाजवळ जमू नका; राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश

70728433

 

मुंबई (वृत्तसंस्था) राज ठाकरेंच्या समर्थनार्थ 22 ऑगस्टला मनसेकडून शक्तिप्रदर्शन होणार आहे. राज ठाकरेंसोबत हजारो मनसैनिक ईडी कार्यालयापर्यंत जातील, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. मात्र थोड्याच वेळात राज ठाकरे यांनी ईडीच्या कार्यालयाजवळ येऊ अथवा जमू नका, असे आदेश स्वत: कार्यकर्त्यांना दिले आहेत.

 

राज ठाकरे यांनी म्हटले की, एवढ्या वर्षात आता तुम्हाला आणि मला केसेस आणि नोटीस यांची सवय झाली आहे. म्हणूनच 22 ऑगस्टला शांतता राखा, अशी विनंती राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केली आहे. सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होणार नाही आणि सामान्य जनतेला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. तुम्हाला डिवचायचा प्रयत्न होत आहे, पण तुम्ही शांत राहा, असे राज ठाकरे यांनी आवाहन केले आहे. माझ्यावर असलेल्या तुमच्या प्रेमाची मला जाणीव आहे, तरीही ईडीच्या कार्यालयाजवळ जमू नका, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.

Exit mobile version