Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

टाकरखेडा शाळेला जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी दिली भेट

पहूर, ता.जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । टाकरखेडा येथील जि.प मराठी शाळेला जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, जामनेर तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी तसेच जिल्हा क्रीडा कार्यालयीन कर्मचारी विनोद कुलकर्णी यांनी अचानक भेट दिली.

याप्रसंगी शाळेच्या वतीने ग्रेडेड मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी उपस्थितांचे शाल, गुलाबपुष्प देवून स्वागत केले. रविंद्र नाईक यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, अभ्यासाबरोबर खेळाकडे व आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्यावे. खेळाडूवृती मुळे आरोग्य सुदृढ आणी निरोगीमय राहते.

केंद्रस्तरीय झालेल्या क्रीडास्पर्धेत टाकरखेडा शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे रविंद्र नाईक यांनी प्रत्यक्ष जवळ बोलवून अभिनंदन केले. उपशिक्षक जयंत शेळके यांनी जिल्हा क्रीडा कार्यालय जळगाव यांच्या कडून मिळालेल्या क्रीडा साहित्याची सविस्तर माहिती दिली. जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्रत्यक्ष साहित्याची पाहणी केरून निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या शाळेविषयी समाधान व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांना विविध खेळांविषयी माहिती विचारून सविस्तर खेळांचे वर्णन केले.

Exit mobile version