Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रवादी ओबीसी सेलची जिल्हा आढावा बैठक उत्साहात

जळगाव प्रतिनिधी । शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल जळगाव जिल्हा आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्रभैय्या पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली. बैठकीदरम्यान पक्षाकडून उत्तर महाराष्ट्र निरीक्षक म्हणून एडवोकेट सचिन होते. सह निरीक्षक गिरीश भांबरे तसेच राष्ट्रवादी जिल्हा समन्वयक विकास पवार जळगाव महानगराध्यक्ष अभिजीत पाटील युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार ओबीसी सेलचे प्रांताध्यक्ष श्‍वर बाळबुधे यांनी महाराष्ट्रात विभागनिहाय आढावा बैठक घेण्यासाठी प्रभारी विभाग निरीक्षक नियुक्त करून दहा तारखेपर्यंत सदर विभागाचा अहवाल सादर करण्यासाठी आदेश दिलेले असताना आज जळगाव जिल्ह्याचे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत लोकसभा निवडणुका विधानसभा निवडणुका यामध्ये तालुकाध्यक्ष यांच्या कामकाजाचा आढावा आपल्या तालुक्यातील ओबीसींच्या समस्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या शेतकऱ्यांचे प्रश्न ग्रामपंचायतींचे प्रश्न राष्ट्रवादी अभिप्राय नोंदणी अभियानात नोंदविलेल्या सदस्य नोंदणीचा आढावा यासह येणाऱ्या काळात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत तसेच ओबीसींच्या प्रत्येक जाती घटकांना समाविष्ट करून आपल्या संघटनात्मक उपाययोजनांसाठी आराखडा तयार करण्यास सूचना करण्यात आल्या.

सुचना व यांची होती उपस्थिती 

याप्रसंगी केंद्र शासनाच्या ओबीसी धोरणावर येणाऱ्या काळात आंदोलनात्मक भूमिका घेऊन ओबीसींना न्याय मिळवून देणे क्रिमिलियर मुळे विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या रुकसाना बाबत योग्य निर्णय घेण्यास सरकारकडे मागणी करणे अशा अनेक विषयांवर चर्चा मार्गदर्शन व सूचना करण्यात आले. याप्रसंगी पाचोरा तालुका अध्यक्ष सिताराम पाटील, भुसावळ तालुका अध्यक्ष विशाल कोलते, जळगाव तालुका अध्यक्ष मधुकर पाटील, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष साहेबराव पाटील, रावेर तालुका अध्यक्ष सूनील कोंडे, यावल तालुका अध्यक्ष निवृत्ती धांडे, जामनेर तालुकाध्यक्ष राजू नाईक, धरणगाव तालुका अध्यक्ष अनिल पाटील, अमळनेर तालुका अध्यक्ष भगवान पाटील हे उपस्थित होते. तसेच भुसावळ शहराध्यक्ष निलेश कोलते यासह जळगाव महानगर अध्यक्ष कौसर काकर व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जळगाव जिल्हा सरचिटणीस अरविंद देवरे यांनी केले तर आभार महानगराध्यक्ष कौसर का कर यांनी केले.

 

Exit mobile version