जिल्ह्याला प्राप्त झालेले व्हेंटिलेटर निकृष्ट दर्जाचे : जिल्हाध्यक्ष मराठे (व्हिडिओ )

जळगाव, प्रतिनिधी  | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास पंतप्रधान सहाय्य्य निधीमधील ७८ व्हेंटिलेटर प्राप्त झाले आहेत. हे व्हेंटिलेटर निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करीत श्रेय लाटणार्‍या भाजप पक्षाचे लोकप्रतिनिधी यांनी सर्वस्वी जबाबदारी घेऊन हमीपत्र भरून द्यावे अशी मागणी जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी केली आहे.

पंतप्रधान सहाय्य निधीमधून मोदी सरकारने २ हजार कोटी रुपये खर्च करा ५० हजार व्हेंटिलेटर बनवण्याचे कॉन्ट्रॅक्ट स्टार्ट अप इंडियाच्या नावाखाली काही भारतामधील खाजगी कंपन्यांना दिले. अग्वा हेल्थकेअर नावाच्या कंपनीने १० हजार व्हेंटिलेट बनवून मोदी सरकारकडे सुपूर्त केले. परंतु, हे सर्व व्हेंटिलेटर निकृष्ट दर्जाचे असल्याचे निष्पन्न झाले असल्याचे श्री. मराठे यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्याला मिळाले ७८ निकृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर

पंतप्रधान सहाय्यता निधी मधून घेतलेल्या व्हेंटिलेटरची तपासणी करून केंद्राच्या दोन समितीने अहवाल देऊन  अग्वा हेल्थकेअर कंपनीच्या व्हेंटिलेटर मध्ये रुग्णांना १००% ऑक्सीजन पुरवण्याची क्षमता नसल्यामुळे वापरू नये असा अहवाल दिला. यानंतरच्या अहवालात या व्हेंटिलेटर यांना तांत्रिक तपासणीची गरज असल्याचा अहवाल दिला. अतिदक्षता विभागात हे व्हेंटिलेटर वापरत असताना या व्हेंटिलेटरला पर्यायी म्हणून दुसरे चांगल्या दर्जाचे व्हेंटिलेटर उपलब्ध करून ठेवावे. अतिदक्षता विभागात अग्वा हेल्थकेअर कंपनीचे वेंटिलेटर स्वतंत्ररित्या वापरू नये असे स्पष्ट करण्यात आले आहे. जनतेच्या पैशांची लूटमार करून जनतेला फसवून मोदी सरकारने निकृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर महाराष्ट्र सहित देशाला पुरून देशातील व महाराष्ट्रातील रुग्णांच्या जिवास खेळण्याचा प्रयत्न केला श्री. मराठे यांनी व्यक्त केले.

भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी हमीपत्र भरून घ्यावी जबाबदारी
पंतप्रधान सहाय्यता निधीमधुन जिल्ह्याला ७८ व्हेंटिलेटर प्राप्त झाले. जळगाव जिल्हा एनएसयूआयच्या वतीने आव्हान करण्यात आले की, निकृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर जर भाजपाच्या या लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्याला मिळाले असतील तर ते व्हेंटिलेटर जिल्ह्यांमध्ये वापरण्याच्या आधी या लोकप्रतिनिधींकडून हमीपत्र लिहून घेतल्या जावे जेणेकरून या निकृष्ट दर्जाच्या व्हेंटिलेटरचा वापर होऊन जर जिल्ह्यातील रुग्णांच्या जीवितास काही हानी झाल्यास सर्वस्वी जबाबदार भाजपाचे लोकप्रतिनिधी म्हणून जिल्ह्याचे खासदार जबाबदार राहतील अन्यथा हे व्हेंटिलेटर चांगल्या दर्जाचे आहे याचा खुलासा त्यांनी करावा. त्यासाठी जळगाव जिल्हा एनएसयुआयच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी प्राप्त झालेल्या व्हेंटिलेटरची माहिती घेऊन त्या व्हेंटिलेटरवरती हमीपत्र चिटकवून अधिष्ठाता यांना आठवण राहावी म्हणून लोकप्रतिनिधींना बोलावून हमीपत्र भरून घेण्याची मागणी केली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष अमजद पठाण सत्यम कुमार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/509831186452526/

 

Protected Content