Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हा बँकेत विजयाने वाढली कॉंग्रेसची ताकद : जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांचा दावा (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | जिल्हा बँकेत तीन जागांवर विजय मिळविल्याने कॉंग्रेसची ताकद वाढली असल्याचा दावा कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी केला. ते कॉंग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष पवार यांनी सांगीतले की, पक्षाच्यावतीने चार जागा मागण्यात आल्या होत्या. त्यात राजकीय खेळी झाल्याने चोपड्याची जागा लढवता आली नाही. परंतु तीनही जागांवर पक्षाने विजय संपादन केला. पूर्वी एकच जागा होती. आता तीन संचालक झाल्याने पक्षाची ताकद वाढली आहे. हा काँग्रेसच्या एकजुटीचा विजय असल्याचे सांगीतले. दरम्यान, पक्षाच्या विरोधात जावून काम करणाऱ्यांवर कारवाईसाठी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचेही पवार म्हणाले.

महाविकास आघाडीच्या रावेर येथील उमेदवार जनाबाई महाजन यांचे पती गोंडू महाजन यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राजीव पाटील यांच्यावर विश्वासघात केल्याचा आरोप केला. पक्षाने उमेदवारी दिलेली असताना त्यांनी माघार न घेतल्यामुळे जाहीर माघारीची घोषणा केली. यादरम्यान पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात भुमीका बजावली जात असल्याने गनिमी काव्याने निवडणूक लढवत विजय संपादन केल्याचे त्यांनी सांगीतले. आघाडीतर्फे ज्याला उमेदवारी मिळेल त्याचे काम करण्याचे ठरले परंतु ऐनवेळी अरूण पाटील भाजपला जाऊन मिळाल्यानेही ही खेळी केल्याचे ते म्हणाले.

जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत २१ पैकी २० जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला. त्यात काँग्रेने तीन जागांवर विजय मिळवला आहे. जागा विजयी झाल्यानंतर काँग्रेस भवनात जल्लोष करण्यात आला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत प्रदेश उपाध्यक्ष आमदार शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष प्रदिप पवार, शहराध्यक्ष शाम तायडे, जिल्हा परिषदेचे गटनेते प्रभाकर सोनवणे, बँकेचे नवनिर्वाचित संचालक विनोद पाटील, शैलजा निकम, जनाबाई महाजन आदी उपस्थित होते.

फेसबुक व्हिडीओ लिंक

Exit mobile version