Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्यात ना. गुलाबराव पाटील यांची ‘एंट्री’ : जल्लोषात स्वागत

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच जिल्ह्यात येणारे मंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले. तालुक्यातील चोपडी कोंडव्हाय फाटा येथे प्रचंड आतषबाजी व जोरदार घोषणाबाजी करून त्यांचे स्वागत झाले.

ना. गुलाबराव पाटील यांनी लागोपाठ तिसर्‍यांना मंत्रीपदाची तर दुसर्‍यांदा कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी प्रचंड जल्लोषात याचा आनंद साजरा केला होता. यानंतर शनिवार दिनांक १३ ऑगस्ट रोजी ते जिल्ह्यात पहिल्यांदा येणार असल्याचा दौरा अधिकृतपणे जाहीर होताच त्यांच्या अभूतपुर्व स्वागताचे नियोजन करण्यात आले. ना. गुलाबराव पाटील हे आज सकाळी सातच्या सुमारास त्यांच्या शासकीय निवासस्थानावरून निघाले. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास चोपडी कोंडव्हाय फाटा येथे त्यांची जळगाव जिल्ह्यात एंट्री झाली. फटाक्यांची जोरदार आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि गगनभेदी घोषणांनी त्यांच्या स्वागतासाठी जमलेल्या हजारो समर्थकांनी ना. गुलाबराव पाटील यांचा स्वागत केले.

याप्रसंगीच सविता प्रल्हाद पाटील, सरपंच योगेश पाटील, प्रल्हाद संतोष पाटील, संभाजी पाटील यांच्यासह स्थानिक पदाधिकार्‍यांनी ना. गुलाबराव पाटील यांचे औक्षण करून स्वागत केले. तेथून भव्य स्वागतयात्रेस प्रारंभ झाला आहे.

या यात्रेच्या सुरवातील माजी सैनिकांचे वाहन असू ते तिरंगा झेंड्यासह सुशोभीत करण्यात आलेले आहे. यामागे ना. गुलाबराव पाटील यांचे वाहन, मागे पोलिसांची वाहने आणि यामागे सुमारे पाचशे चारचाकी वाहनांचा ताफा अमळनेर शहराकडे निघाला. हा ताफा तब्बल सात किलोमीटर इतका लांब आहे. दरम्यान, वाहतुकीची गैरसोय होऊ नये म्हणून पोलिसांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूने बंदोबस्त ठेवून अचूक नियोजन केले आहे.

 

 

Exit mobile version