Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात 22 सप्टेंबर रोजी ‘जिल्हास्तरीय भावगीत स्पर्धा’

surbhi mahila mandal

 

जळगाव प्रतिनिधी । येथील सुरभि बहुउद्देशीय महिला मंडळातर्फे ‘जिल्हास्तरीय भावगीत स्पर्धा’ दि. 22 सप्टेंबर रविवार रोजी दुपारी 1 वाजता ब्राह्मण सभा, बळीराम पेठ येथे घेण्यात येणार आहे.

या स्पर्धेबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हास्तरीय भावगीत स्पर्धेचे यंदा 17 वे वर्ष असून स्पर्धा फक्त महिला व मुलींसाठी घेण्यात येत असते. 8 ते 16 व 17 ते 40 तसेच महिलांच्या आग्रहास्तव महिलांसाठी 40 च्या पुढील खुला वयोगट अशा 3 गटात होणार आहे. या स्पर्धेत फक्त मराठी भावगीत असेल, तर स्पर्धेत फक्त गीताच्या सुरुवातीचे दोन कडवे म्हणायचे आहेत. तर यासाठी लागणारे वादक मंडळाकडून पुरविण्यात येणार आहे. स्वत: आणल्यास उत्तम.

बक्षीस असणार
लहान गटास ॲड. कै. बापूसाहेब परांजपे (पाचोरा) व मोठ्या गटास ॲड. कै.अ.वा. अत्रे यांच्या स्मरणार्थ रोख बक्षिसे देण्यात येणार आहे.
प्रथम बक्षिस 1000 रु, व्दितीय 700 रु, तृतीय 500 रु आणि उत्तेजनार्थ 251 रु मिळणार आहे. याचबरोबर प्रथम विजेत्यांना ‘स्वरश्री’ चषक दिला जाईल. 40 वर्षे पुढे खुल्या गटासाठी प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार आहे.

नाव नोंदणी व आवाहन
18 सप्टेंबर पर्यंत नाव नोंदणी करण्यात येणार आहे. वेळेवर प्रवेश मिळणार नाही. म्हणून सर्वांनी लवकरात लवकर नाव नोंदणी करुन जास्तीत जास्त स्पर्धेकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन मंडळाच्या अध्यक्षा स्वाती कुलकर्णी यांच्याकडून करण्यात आले आहे.
नाव नोंदणीसाठी संपर्क स्वाती कुलकर्णी (मो. नं.94209437613), आशीर्वाद, विजय कॉलनी, डॉ.चांदीवाल दवाखाना जवळ, गणेश कॉलनी रोड, जळगाव. मंजुषा राव (मो. नं.9405448158) झेड.पी.कॉलनी, महिला शक्ती संघ समोर, जळगाव. विनया भावे (मो. नं. 9423976589) प्लॉट नं 73, त्रितीर्थ, प्रेम नगर वरद विनायक मंदिरासमोर जळगाव.

Exit mobile version