Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हास्तरिय गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराने मुख्याध्यापक के. यु. पाटील सन्मानित

यावल प्रतिनिधी । चिखली तालुक्यातील मुख्याध्यापक म्हणून कार्यरत के.यू. पाटील यांना जिल्हास्तरिय गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

दि.२९ ऑगस्ट२०२१ रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून हॉकी असोसिएशन व गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने २०२१ च्या जिल्हा क्रीडा पुरस्कार साठी श्री दत्त हायस्कूल चिखली येथील मुख्याध्यापक के यु पाटील सर यांची गुणवंत क्रीडा मार्गदर्शक म्हणून निवड करून पुरस्काराचे वितरण २९  ऑगस्ट२०२१ रोजी डाॅ. ए. पी. जे अब्दुल कलाम हॉल जळगाव येथे डॉ केतकी पाटील यांच्या हस्ते व माजी आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे. माजी महापौर विष्णू भंगाळे.जिल्हा क्रीडाअधिकारी मिलिंद दिक्षित क्रीडा संचालक दिनेश पाटील. प्राचार्य पाटील सर, क्रीडा समन्वयक व सचिव प्रा. डाॅ.आसिफ खान आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सदरचा पुरस्कार सोहळ्यात गौरविण्यात आले.  

के यु पाटील सरांना गेल्या २०१९-२० या वर्षांसाठी जिल्हास्तरीय आदर्श क्रीडाशिक्षक; उत्तर महाराष्ट्र क्रीडा रत्न;महाराष्ट्र राज्य राज्य समता शिक्षण परिषद चा गुणवंत शिक्षक; पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते संध्या त्यांच्याकडे यावल तालुका क्रिडा समन्वयक ;शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ अध्यक्ष  आहेत त्यांनी मिळवलेल्या पुरस्कारासाठी त्यांचे तालुक्यातील शिक्षकानी त्यांचे स्वागत केले आहे.

 

 

Exit mobile version