Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तापी नदी काठावरील नागरिकांनी दक्षता घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

hatnur dharan

 

जळगाव (प्रतिनिधी) हतनुर धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातील पाण्यात वाढ होणार आहे. त्यामुळे हतनुर धरणाचे सर्व 41 दरवाजे उघडण्यात आलेले आहे. धरणातून 1 लाख 53 हजार 540 क्युसेक्स वेगाने नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

 

जिल्हाधिकारी डाॅ अविनाश ढाकणे यांनी नागरीकांनी पुरपरिस्थीतीत खबरदारी व दक्षता घेणेबाबत आवाहन केले आहे. त्याअनुषंगाने तापी नदीच्या काठावरील व धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील सर्व नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. विशेषतः रात्रीच्या वेळी नदी नाल्याच्या पाण्याची पातळी वाढण्याची दाट शक्यता असल्याने नदी पात्रात पाणी असताना आत जाऊ नये. अफवांवर विश्वास ठेवू नका, पूर असताना नदी ओलांडू नये. पाणी उकळुन प्यावे, सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. मातीच्या घरांची विषेश काळजी घ्या, अन्न पाणी साठवून ठेवावे असे आवाहन केले आहे.

 

(जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव फो.नं 0257-2223180/2217193–टोल फ्रि.क्रमांक 1077) (अधिक माहिती साठी – जि. आ. व्य. आधि. एन.पी.रावळ 9373789064) यांचेशी संपर्क साधण्याचेही आवाहन केले आहे.

Exit mobile version