Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हा रूग्णालयासमोर ‘मनातील मित्र’ ग्रुपतर्फे रुग्णांच्या नातेवाईकांना मठ्ठा वाटप

जळगाव प्रतिनिधी । शहरातील ‘मनातील मित्र’ ग्रुपतर्फे कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना मठ्ठा वाटप करण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयासमोर आज दुपारी घेण्यात आला. ऐन कडक उन्हाळ्यात मठ्ठ्याचा आस्वाद आणि गारवा मिळाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयासमोर कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची दिवसभर गर्दी असते. अनेक गरीब रुग्णांच्या नातेवाईकांचे जेवण व पाण्यासाठी हाल होत आहे. ही समस्या लक्षात घेता ‘मनातील मित्र’ ग्रुपतर्फे सामाजिक कार्यकर्ते नाना भोळे यांच्या वाढदिवसानिमित्ताचे औचित्य साधून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोरील मुख्य प्रवेश द्वारासमोर कोवीड रुग्णांच्या नातेवाईकांना मठ्ठा वाटप करण्यात आला. हा उपक्रम माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष योगेश कलंत्री, सचिव विलास काबरा, ज्ञानेश्‍वर भोळे, अशोक माळी, नरेश मंधान, रामचंद्र पाटील, नीलेश लढ्ढा, महेश मणियार, रमेश मंधान, गणेश दास, किशन कुकरेजा, प्रमोद झवर आदींनी राबवला.

 

Exit mobile version