Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चुंचाळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

यावल, लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील ‘चुंचाळे’ येथे जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमा अंतर्गत मोफत शालेय गणवेश वाटप कार्यक्रम संपन्न झाला.

शालेय गणवेश वाटपाप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिपक कोळी, उपाध्यक्ष लुकमान तडवी, अमीर तडवी, अशोक धनगर, सुरेश पाटील, नथू तडवी, माधुरी गजरे, सोनाली पाटील, अरिफा तडवी, रजिया तडवी, राजश्री पाटील, ग्राम पंचायत सदस्य सुकलाल पाटील तसेच ‘गुंज फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेचे रोहित पवार व श्री.राजपूत हे उपस्थित होते.

कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेतील ६९ विद्यार्थी आणि ८६ विद्यार्थीनी अशा एकुण १५५ विद्यार्थ्यांना गणवेश वितरण करण्यात आले. गुंज फाउंडेशनच्या वतीने रोहीत पवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, ड्रॉइंग मटेरियल, एज्युकेशनल पझल किट, शाळेस फर्स्टएड किट भेट देण्यात आले. कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहूल वाणी यांनी केले तर आभार मुख्याध्यापक गिरीश सपकाळे यांनी मानले .

 

Exit mobile version