Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मनवेल येथील गरजूंना खावटी कीटचे वाटप

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील मनवेल येथील कै.व्ही.व्ही. तांबट अनुदानित आश्रम शाळेतील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत खवटी कीटचे वढोदा प्र. येथील सरपंच संदीप सोनवणे आणि संस्थेचे अध्यक्ष हुकुमचंद पाटील यांच्या हस्ते  वाटप करण्यात आले.

यावल आदीवासी विकास प्रकल्प कार्यलय अंतर्गत मनवेल येथील अनुदानित आश्रम शाळेत संस्थेचे अध्यक्ष हुकुमचंद पाटील यांचा अध्यक्षस्थानी खावटी कर्ज योजना अंतर्गत कीट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून वढोदा ग्रामपंचायत सरपंच संदिप  सोनवणे, ग्रामपंचायत सदस्यं सुक्राम सोनवणे, संस्थेच्या सचिव मिराबाई पाटील, संचालक मंगलराव पाटील,मनवेल येथील पत्रकार  गोकुळ कोळी आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. 

राज्यातील आदीवासी लोकांना कोवीड १९ च्या प्रादुर्भाव मध्ये रोजगार उपलब्ध नसल्यामुळे उपासमार होऊ नये यादृष्टीकोणातुन आघाडी शासनाने अनु.जमाती च्या लोकांना खावटी कर्ज योजना अंतर्गत दोन हजार रुपये रोख व दोन हजार रुपयात जिवनावश्यक कीराणाचे कीट वाटप करण्यात येत असल्याने आदीवासी बांधवांमध्ये या योजनेचा लाभ देण्यासाठी प्रत्येक लाभार्था पर्यत आदीवासी विभागाने शोध घेतला व गरजूना खावटी कीट वाटप केलीत असे या प्रंसगी संदिप सोनवणे यांनी  कीट वाटप प्रंसगी बोलताना सागीतले.

यावेळी शाळेचे अधिक्षक वसंत पाटील, मुख्यध्यापक सचिन पाटील, संजय अलोणे, सरीता तडवीसह शाळेतील शिक्षक कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्तविक व सुत्रसंचालन राकेश महाजन यांनी केले तर उस्थितांचे आभार सुभाष पाटील यांनी मानले.

Exit mobile version