केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे गरजूंना रेशन वाटप; जिवदया फाऊंडेशनचे सहकार्य

जळगाव प्रतिनिधी । केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे २४ ते २९ जुलै या दरम्यान १९७ गरजू कुटुंबांना शिधा वाटप करण्यात आला. यासाठी अमेरिका येथील जिवदया फाऊंडेशन यांनी सहयोग दिला.

केशवस्मृती प्रतिष्ठानचे संचालक डॉ धर्मेंद्र पाटील, आरोग्य विभाग प्रमुख भानुदास येवलेकर आणि टीम यांनी शहरात केलेल्या सर्वेक्षणच्या माध्यमातून पांचाळ वस्ती, भिल्ल वस्ती, समता नगर,पिंप्राळा,चौगुले प्लॉट, शनिपेठ,हुडको, मेहरूण तसेच कुसुंबा, टाकरखेडा, दोनगाव, ममुराबाद, नांद्रा या गावातील शहरात येणारे रोजंदार कामगार ज्यांचे या कोरोना आपत्तीच्या काळात आर्थिक नुकसान झाले आहे. अशा कुटुंबांना मदत या वेळी करण्यात आली. प्रत्येक कुटुंबाला १० कि. तांदूळ, १ कि.चना डाळ, १ कि. मुगडाळ, १ कि. तेल, ५ कि.बटाटे, ५ कि. कांदे, ५ कि. आटा, मीठ, हळद, मिरची पावडर अशा वस्तू देण्यात आल्या. यावेळी संचालक डॉ.नितीन चौधरी, संजय नारखेडे हजर होते. संस्थेचे अध्यक्ष भरतदादा अमळकर, उपाध्यक्ष नीळकंठ गायकवाड, सचिव रत्नाकर पाटील जिवदया फाऊंडेशन चे सदस्य आणि सर्व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या मदतीचे नियोजन करण्यात आले होते. धान्य वितरण करण्यासाठी विनोद पाटील, कुणाल शुक्ला, रोहन सोनगडा, राहुल महिरे यांनी परिश्रम घेतले.

Protected Content