Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाल आश्रमातील वृद्धांना साहित्याचे वितरण

यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पाल येथील संत श्री. लक्ष्मण चैतन्यजी आश्रम श्री वृंदावन धाममध्ये वृद्धांना  डॉ.कुंदन  फेगडे यांच्यातर्फे  साहित्य वितरण करण्यात आले.

 

वृध्दापकाळात थकलेल्या शरिरास आधाराची गरज असते यात इतर साहित्यांपेक्षा मानसिक आधार अधिक महत्वाचा असतो.  तेव्हा पंडीत दिन दयाल उपाध्य यांच्या शिकवणीनुसार समाजातील प्रत्येक घटकास मदत करतांना ती आदरयुक्त दायीत्वातुन केली गेली पाहिजे असे प्रतिपादन यावल येथील डॉ. कुंदन फेगडे यांनी व्यक्त केले.  ते पालच्या संत श्री. लक्ष्मण चैतन्यजी आश्रम श्री वृंदावन धाममध्ये साहित्य वाटप कार्यक्रमात बोलत होते. या आश्रमातील जेष्ठांना काय आवश्यक आहे हे जाणुन घेत त्यानुसार त्यांनी साहित्य खरेदी करून हे साहित्य जेष्ठांना वितरण करण्यात आले. वेदनांनी ग्रासलेल्या जेष्ठांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य हेचं माझे पुण्य संचय असे देखील याप्रसंगी डॉ.कुंदन फेगडे यांनी सांगितलं.  आश्रमातील जेष्ठांना काही आरोग्य विषयक साहित्यांची आवश्यकता आहे ही माहिती आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे यांना मिळाली तेव्हा  स्वत: पुढाकार घेत पदरमोड करीत त्यांनी आरोग्य विषयक विविध साहित्यांची खरेदी करून त्याचे वितरण केले.  पंडीत दिन दयाल उपाध्य यांच्या शिकवणीनुसार समाजातील प्रत्येक घटकास मदत करतांना ती आदरयुक्त दायीत्वातुन केली गेली पाहिजे या अनुशंगाने आपण आपल्या परीने जेष्ठांसाठीचे कार्य करीत असल्याचे प्रसंगी त्यांनी सांगीतले या कार्यक्रमा प्रसंगी डॉ.कुंदन फेगडे,सागर लोहार ,मनोज बारी आदींची उपस्थिती होती

 

या साहित्याचे वितरण

वृंदावन धाम आश्रमातील जेष्ठांना दैनदिनी जिवनात उपयोगा करीता कमोड खुर्ची, खुर्चीच्या आधारासाठी काड्या, कमरेचे पट्टे, माणक्याचे पट्टे सह विविध साहित्य आणि आरोग्य विषयक वस्तू वाटप केल्या.

 

डॉ. कुंदन फेगडे यांनी समाजातील जेष्ठांप्रती आदर हे आपले संस्कार असुन आपल्या सांस्कृतीत वयोवृध्दा प्रतिचा सन्मान करणे आहे तेव्हा जेष्ठ कोणी ही असो ते आपल्याला पितृतुल्य असतात म्हणुन त्यांच्या करीता प्रत्येकाने दायीत्व दाखवले पाहिजे अशी भावना व्यक्त केली.

Exit mobile version