चाळीसगावात दिव्यांगांना साहित्याचे वाटप

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते आज येथे दिव्यांनांना उपयुक्त ठरणार्‍या साहित्याचे वाटप करण्यात आले.

चाळीसगाव येथील अंध शाळेच्या प्रांगणात दिव्यांग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद जळगाव, रेडक्रॉस जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने चाळीसगाव तालुका व परिसरातील १५० दिव्यांग व्यक्तींना खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या हस्ते विविध साहित्याचे वाटप करण्यात आले.

स्वयंदिप संस्थेच्या अध्यक्षा मिनाक्षीताई निकम यांनी मनोगत व्यक्त केले.जिल्हा अपंग पुनर्वसन समन्वयक गणेशकर यांनी प्रास्ताविकातून शिबिराची माहिती दिली. यावेळी तहसिलदार संदीप पाटील, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर,जिल्हा परिषदेचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी विजय रायसिंग, जिल्हा पुनर्वसन अधिकारी जी टी महाजन, दिव्यांग बांधवांच्या आधारस्तंभ मिनाक्षीताई निकम, सामाजिक कार्यकर्ते वर्धमान धाडीवाल, जीपचे दिव्यांग विभाग प्रमुख भरत चौधरी, नगरसेवक रामचंद्र जाधव, संभाजी सेनेचे लक्ष्मणबापू शिरसाठ, सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे, रयत सेनेचे गणेश पवार, सामाजिक कार्यकर्ते खुशाल पाटील, रमेश पोतदार, रोटरीचे समकीत छाजेड, पत्रकार अजीज खाटीक, रामलाल मिस्तरी, गौतम आरव, गणेश गवळी, विजय गवळी, दिपक पाटील, प्रहार संघटनेचे निळकंठ साबळे,राजूदादा जाधव,पुंडलिक पाटील, देवेश पवार,मनीषाताई पाटील, देवराम रावते, दत्तू जाधव, वाल्मीक खैरनार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

खासदार उन्मेशदादा पाटील म्हणाले की आज ज्या दिव्यांग बांधवांना साहित्य मिळाले आहे त्यांनी या साहित्यातून आत्मनिर्भर व्हावे.एक वेगळी ऊर्जा या साहित्यातून तुम्हाला मिळणार असून भविष्यात देखील ज्या दिव्यांग बंधू-भगिनींना साहित्याची गरज आहे त्यांच्यासाठी देखील शासन प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. यावेळी ४३ तीनचाकी सायकल,२० व्हील चेअर,१० कुबड्या, १० कर्ण यंत्र,वॉकर व काठी,६० कृत्रिम अवयव व सहाय्यक उपकरणे व इतर साहित्याचे वाटप खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.शिबिराला मोठया संख्येने दीव्यांग बांधवांच्या परिवारातील सदस्य, कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content