Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सारांश फाऊंडेशनतर्फे रेल्वे स्थानक परिसरात मास्कचे वाटप (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त शहरातील रेल्वे स्थानक परिसरात सारांश फाऊंडेशनतर्फे अध्यक्षा निलू इंगळे यांच्यातर्फे गरजूंना मोफत मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

शहरातील सारांश फाऊंडेशनच्या अध्यक्षा निलूताई इंगळे यांच्याहस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्ता आज १४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता शहरातील रेल्वे स्थानकासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आली. यावेळी फाऊंडेशनचे नागसेन पगारे, सोनाली पवार, नितीन पवार, संगिता पगारे, शारदा तायडे, संजय इंगळे, सुनिल तायडे आणि अक्षय इंगळे आदींची उपस्थिती होती.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केल्यानंतर परिसरातील उपस्थित असलेले होमगार्ड, पोलीस कर्मचारी यांच्यासह गरजूंना मोफत मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी सोशल डिस्टन्सिंग व शासनाच्या नियमांचे पालन करून मास्क वाटप करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिवादन करण्यात आल्याची माहिती फाऊंडेशनच्या अध्यक्षा निलूताई इंगळे यांनी सांगितले.

 

Exit mobile version