Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्ताने मास्क व आर्सेनिक अल्बम-30 गोळ्याचे वाटप

जळगाव प्रतिनिधी । माजी महसूल मंत्री व भाजपा जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज (दि.०२) रोजी मंडल क्र. ९ मध्ये कोरोना रोगाचा प्रादुर्भाव बघता मास्क व आर्सेनिक अल्बम-30 गोळ्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी जळगाव शहर तथा जिल्हा अध्यक्ष जळगाव ग्रामीणचे आमदार राजू मामा भोळे, स्थायी समिती सभापती ज.म.न.पा. सुचिताताई हाडा, नगरसेविका गायत्री ताई राणे, दिपमाला काळे, जिल्हा चिटणीस भाजपा राहुल भाऊ वाघ, सरचिटणीस भाजपा म. क्र.९ संजय भाऊ तिरमले, सरचिटणीस अनंत भाऊ देसाई, रविंद्र सपकाळे, सुरसिंग पाटील, गणेश सोनवणे, तेजस जोशी, रवि सोनार आदी सर्व भाजपा मंडल क्र. ९ चे पदाधीकारी उपस्थित होते.

Exit mobile version