जमात-ए-इस्लामी हिंदच्या वतीने गरजू कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप

जळगाव प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा, शिवाजीनगर हुडको परिसरात जमात-ए-इस्लामी हिंदच्या वतीने कोरोना महामारीमुळे बेरोजगार झालेल्या २६५ कुटुंबियांना आज रविवारी दुपारी किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.

कोरोना महामारीच्या आजाराने बेरोजगारी व आर्थीक चणचण असलेल्या कुटुंबियांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. शहरातील शिवाजी नगर हुडको आणि पिंप्राळा हुडको, तांबापूरा यासह झोपडपट्टी भागात जमातचे सदस्यांनी किराणा साहित्याचे वाटप केले. दरवर्षीप्रमाणे संघटनेने हा उपक्रम राबविला असून आतापर्यंत २६५ कुटुंबाना किराणा साहित्य देण्यात आले आहे. 

हा उपक्रम राबवित असतांना सदस्यांनी कुटुंबियांची समस्या जाणून घेतली होती. किराणा साहित्यात तांदूळे, तेल, साबण, खजूर आणि दैनंदिन वस्तू असा एकुण अडीच लाख रूपयांचे वस्तू वितरण करण्यात आले आहे. यासाठी काही दानशूर व्यक्तींनी हातभार लावला आहे. अशी माहिती जमात ए इस्लामी हिंदचे अध्यक्ष सोहेल अमीर शेख यांनी दिली. 

Protected Content