Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जनमत प्रतिष्ठानतर्फे दिव्यांग मुलांना किराणा साहित्य व मास्कचे वाटप

जळगाव, प्रतिनिधी ।  कोरोना काळात अनेकांना झळ बसली आहे. यात दिव्यांग मुलांना देखील फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील जनमत प्रतिष्ठानच्या वतीने ३० दिव्यांग मुलांना आज मंगळवारी शहरातील रेड प्लस ब्लड बँकेत किराणा साहित्य व मास्कचे वाटप करण्यात आले.

 

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेकांचे रोजगार गेले. रोजगारामुळे एकावेळे जेवणही मिळेनासे झाले आहे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या पार्श्वभूमीवर मुळजी जेठा महाविद्यालयासमोरील रेड प्लस ब्लड बँकेत जनमत प्रतिष्ठानच्या वतीने ३० दिव्यांग मुलांना किराणा साहित्य व मास्कचे आज सकाळी ११ वाजता वाटप करण्यात आले. किराणा साहित्य दिल्याने दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर समाधान व्यक्त होत होते.

 

याप्रसंगी नगरसेविका निती सोनवणे यांच्याहस्ते किराणा वाटप करण्यात आला. याप्रसंगी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, संस्थेस निलेश शांताराम पाटील, वर्षा अहिरराव मॅडम, पोलीस सेवा संघटनेचे हर्षाली पाटील मॅडम, जिल्हा न्यायालयाचे प्रकाश सपकाळ ,सागर कोळी,अरूनाई बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राहुल कोळी, राजेंद्र कुमार वर्मा ,संजय कुमार सिंग,,  मार्केट स्पेशल चे मुख्य संपादक हेमंत वैद्य यांचे सहकार्य लाभले.

Exit mobile version