Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ईद ए मिलादनिमित्ताने धान्य व ब्लँकेटचे वाटप

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरात नगरसेवक शेखा हाजी यांच्या वतीने हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मोत्सवानिमित्त ईद ए मिलादचे पवित्र दिनानिमित्ताने गोर गरिबांना धान्य व ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.

 

 

ईद ए मिलादनिमित्ताने मानव सेवा तिर्थ येथे बेवारस व गरिबांना यांना नगरसेवक शेखा हाजी यांच्यातर्फे धान्य वाटप करण्यात आले. आ. अनिल पाटील यांच्या हस्ते धान्य वाटप करण्यात आले. नगरसेवक शेखा हाजी यांच्या वतीने हा उपक्रम राबण्यात आला. यावेळी १०० ते १५० गरीब लोकांना धान्य व ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ. अनिल पाटील, मुख्तार खाटीक, राजू शेख, सत्तार मास्टर,अॅड. रज्जाक शेख, माजी नगरसेवक सलीम टोपी, माजी नगरसेवक नरेंद्र संदाशिव, पत्रकार आबिद शेख, गुलाम नबी, आरिफ पठान, इब्राहिम पठाण, दबीर पठाण, मोहम्मद साबीर अफरोज खासब, मोयोद्दीन मिस्त्री आदी उपस्थित होते.

 

Exit mobile version