Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धरणगावात गाडगे बाबा पुण्यतिथीनिमित्त “फळ वाटप”

dharangaon 3

धरणगाव प्रतिनिधी । शहरात आज राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची ६३वी पुण्यतिथी उत्साहात साजरा करण्यात आली असून यानिमित्ताने येथील मुखबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना फळ वाटप करण्यात आले.

सर्वप्रथम संत गाडगे बाबांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, न.पा.निवडणूकीचे शिवसेनेचे उमेदवार निलेश चौधरी, भाजपचे उमेदवार मधुकर रोकडे, माजी प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी, परीट समाजाचे प्रांत सदस्य छोटू जाधव, तिळवण तेली समाजाचे अध्यक्ष सुनील चौधरी, शिवसेना संघटक धिरेंद्र पुरभे, नगरसेवक नंदू पाटील, गुलाब मराठे, काँग्रेसचे दिपक जाधव, शिवसेना उपशहर प्रमुख रवींद्र जाधव, किरण अग्निहोत्री, परीट समाजाचे शहर प्रमुख गणेश जाधव, विनोद जाधव, आकाश जाधव, कैलास सुर्यवंशी, कैलास इंगळे, वाल्मिक पाटील, योगेश पाटील, बापू जाधव, भडगे, आर.एस.पाटील, कमलेश बोरसे, छोटू पुरभे यावेळी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेंसाठी मुखबधिर विद्यालयाचे शिक्षक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विनोद रोकडे यांनी केले.

Exit mobile version