Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिरसोली येथील टायगर गृपतर्फे वाढदिवसानिमित्त गरीब व गरजूंना मोफत अन्न वाटप

जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील टायगर गृपचे सदस्य तौसीफ खाटीक यांचा वाढदिवस असून वाढदिवसांचा वायफळ खर्च न करता जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल असलेल्या कोवीड रूग्णाच्या नातेवाईकांना रूग्णालयासमोर आज गुरूवारी रात्री ८ वाजता जेवण वाटप करण्यात आले.

टायगर ग्रुप संस्थापक जालिंदर जाधव, टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. तानाजी जाधव, टायगर ग्रुप उत्तर महाराष्ट्र सदस्य सागर कांबळे, टायगर ग्रुप खान्देश अध्यक्ष ऋषीकेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शिरसोली येथील टायगर गृपचे सदस्य तौसिफ खाटीक यांचा आज ३ जून रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आज शहरातील सिंधी कॉलनी, चिमुकले राम मदीर, जिल्हा शासकीय रूग्णालयासमोर आणि तालुक्यातील रामदेव वाडी येथील रस्त्यावर काम करणाऱ्या मजूरांना खिचडी वाटप करण्यात आले. कोरोना काळात सर्व लॉकडाऊन असतांना नातेवाईकांना जेवणाची मोठी अडचणी निर्माण होत होती. ही गोष्ट टायगर गृपच्या सदस्यांना समजल्यानंतर त्यांनी वाढदिवसांचा खर्च वाचवून रूग्णांच्या नातेवाईकांना जेवण वाटप करण्यात आले.

याप्रसंगी बंटी ताडे, कुणाल बारी, सर्पराज पिंजारी, हर्षल सुरवाडे, मोहन ठाकरे, दिनेश बारी, फिरोज तडवी, विशाल इंगळे, शुभम शिंपी, विवेक बारी, गणेश वानखेडे यांच्यासह जळगावचे गौरव उमप, मनोज बाविस्कर, अंकूश मराठे आदींची उपस्थिती होती.

Exit mobile version