Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रोटरी क्लब ऑफ जळगाव स्टार्सच्या वतीने रुग्णांच्या नातेवाइकांना फराळचे वाटप

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा रूग्णालयाच्या बाहेर रूग्णांच्या नातेवाईकांचे लॉकडाऊनमुळे एका वेळाच्या जेवणाचे हाल होत असल्याने रोटरी क्लब ऑफ स्टार्सच्या वतीने गरीब व गरजू नातेवाईकांना तीन दिवस पुरेल असे सुके फराळ आणि पाण्याची बाटलीचे वाटप आज रात्री  ७ वाजेच्या सुमारास करण्यात आले.

कोरोनाच्या काळात अनेक रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. याच काळात त्यांचे नातेवाईकांना जिल्हा रूग्णालयात बाहेरच रात्रंदिवस बाहेरच थांबावे लागत आहे. त्यात दिवसभर लॉकडाऊन असल्यामुळे सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान काही दुकाने उघडी असतात. नंतर दिवसभर बंद असते, अश्यावेळी नातेवाईकांचे पिण्याच्या पाण्याची आणि जेवनाची सोय उपलब्ध होत नसल्यामुळे प्रचंड हाल होत आहे. अश्या परिस्थितीत त्याच्याकडे अनेकांचे दुर्लक्ष होत आहे. याची दखल घेत आपण समाजाचे देणे लागतो याचे भान ठेवून रोटरी क्लब ऑफ जळगाव स्टार्सच्या वतीने आज सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास जिल्हा रूग्णालयाच्या आवारात बसलेले व झोपलेल्या गरीब व गरजू नातेवाईकांना तीन दिवस पुरेल असे सुके फराळ व पाण्याची बाटलीचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ जळगावचेअध्यक्ष धनराज कासट, सागर मुंदडा, करण ललवाणी, पुनीत तलरेजा आदींची उपस्थिती होती.

 

Exit mobile version