Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हरताळा येथे पोलीस निरीक्षक खताळ यांच्याहस्ते गरजूंना जीवनावश्यक वस्तूचे वाटप

मुक्ताईनगर प्रतिनिधी| तालुक्यातील हरताळा येथील गरजूंना यंदाची दिवाळी साजरा करता यावी यासाठी मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या प्रयत्नातून विविध जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.

देशात आजही अनेकांच्या घरात हलाखीची परस्तीथी असल्यामुळे दिवाळी सारखा सण त्यांच्याकडून साजरा केला जात नाही. अश्या निराधारांना यंदाची दिवाळी सण साजरा करता यावे म्हणून पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी तालुक्यातील हरताळा येथे आज जीवनावश्यक वस्तूचे  वाटप केली. यात प्रमुख्याने साखर, रवा , मैदा, तूप, तेल, साबण, सोन पापडी, शेव, मुरमुरे, मका पोहे, मीठ अशा विविध पदार्थांचे समाविष्ट होते. देशात अजून असे बरेच लोक आहेत की, ते दिवाळी सारखा सण साजरा करू शकत नाही. अशा निराधार लोकांची दिवाळी गोड व्हावी त्यासाठी मी हा उपक्रम राबविले आहे असे पोलीस निरीक्षक खताळ यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मोठ्या प्रमाणावर निराधार वृद्ध महिला व नागरिक उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमास प. पु. आझादगिरी महाराज, शंकरगिरी, पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकडे, पोलीस अंमलदार गनेश मनुरे, हवा. अशोक जाधव,पोकॉ मंगल साळुंखे,पोकॉ माधव गोरेवार, संदीप सपकाळ, सुनील जंजाळ, सोपान दांडगे, प्रदिप काळे, चंद्रामनी इंगळे आदी उपस्थित होते. दरम्यान मनोगत प्रदिप काळे यांनी व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी गणपत कोळी , संजय भोईटे,बंडू शेळके यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जंजाळ यांनी तर आभार सोपान दांडगे यांनी मानले.

 

Exit mobile version