Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जागतीक दिव्यांग दिना निमित्ताने दिव्यांग बांधवांसाठी जीवनावश्यक वस्तुचे वाटप

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जागतीक दिव्यांग दिना निमित्त यावल येथे दिव्यांग बांधवांसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाले, यावेळी दिव्यांग संस्थेच्या महिला आघाडीची यावल तालुका कार्यकारणी देखील जाहीर करण्यात आली.

दिव्यांग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू, प्रहार दिव्यांग क्रांती संस्था संघटनेचे राज्यध्यक्ष बापूराव काणे, डॉ.रामदास खोत, महाराष्ट्र संपर्क प्रमुख तथा राज्य प्रमुख महासचिव तसेच उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या प्रेरणेने तसेच प्रहार दिव्यांग संस्था संघटना जळगाव जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या सुचने वरून व प्रहार दिव्यांग संघटना जिल्हा उपाध्यक्ष दिनेश सैमिरे व जिल्हा सल्लागर शरद बरजिभे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार दिव्यांग संस्था संघटना यावल येथे ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन सरस्वती विद्या मंदिर यावल येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रहार दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील तसेच जिल्हा सल्लागार शरद बरजिभे तसेच प्रहार शेतकरी आघाडी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश चिंधु पाटील साहेब उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत वारूळकर यांनी केले कार्यक्रमाच्या प्रसंगी सुरुवातीला सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलित केले व संस्थेचे माजी तालुका अध्यक्ष कै.मोहन सोनार यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला प्रहार दिव्यांग संघटनेचे यावल तालुका अध्यक्ष प्रविण सोनवणे यांनी केलेल्या कार्याचा आढावा दिला त्यानंतर प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी दिव्यांग बांधवांना मिळत असलेल्या विविध शासकीय योजनांचा दिव्यांगांना होणाऱ्या लाभ या संदर्भात मार्गदर्शन केले.

त्या प्रसंगी प्रत्येक दिव्यांगाच्या चेहऱ्यावर आनंद दिसू आले, यावेळी  बाळासाहेब पाटील यांनी दिव्यांगांच्या विविध समस्यांचे निवारण केले तसेच या प्रसंगी यावल तालुका प्रहार दिव्यांग संघटनेची महिला आघाडीची कार्यकारिणी जाहीर केली. प्रहार दिव्यांग संघटनेच्या अध्यक्षपदी  खुशबू दिगंबर चौधरी यांची निवड झाली तसेच उपाध्यक्षपदी सरला तायडे यांची नियुक्ती करण्यात आली शहर अध्यक्षपदी मंगला बारी यांची नियुक्ती झाली.

तालुका सल्लागारपदी गीतांजली शशिकांत वारूळकर रा यावल यांचे नियुक्ती झाली त्या नंतर आलेल्या दिव्यांग बांधवांसाठी अल्प उपहार देण्यात आला व गरजू दिव्यांग बंधू आणि भगिनींना ब्लॅकेटचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमासाठी सरस्वती विद्या मंदिर यावल यांचे संस्था प्रमुख रमण  देशपांडे वअध्यक्ष अरुण कुलकर्णी तसेच मुख्याध्यापक मुख्यध्यपक  जी डी कुलकर्णी सर यांनी दिव्यांगांसाठी शाळा उपलब्ध करून दिली व व किरण भाऊ ओतारी तसेच त्यांचे सहकारी यांचे सहकार्य आम्हास लाभले कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रहार दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी जनार्दन फेगडे ,मिथुन सावखेडकर,विश्वनाथ बारी, दिलीप आमोदकर, प्रदीप माळी, उत्तम कानडे, दिलीप चौधरी, सुभाष पाटील, भगवान फेगडे, .गोविंदा बारी तसेच रुग्णसेवक नदीम खान उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी यावल तालुक्यातील विविध व्यापारी वर्गाने कार्यक्रमास मदत केली तसेच प्रत्येक दिव्यांग बंधू आणि भगिनी यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कार्यक्रम संपन्न करण्यासाठी परिश्रम घेवुन कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या सर्वांचे संस्थेचे तालुका अध्यक्ष प्रविण सोनवणे यांनी आभार मानले.

Exit mobile version