Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खा.सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त मजुरांना कपडे वाटप

मुक्ताईनगर प्रतिनिधी । संसदरत्न खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त आदिशक्ती मुक्ताईसह सूतगिरणी मुक्ताईनगर येथील महिला कामगारांना साडी आणि पुरुष कामगारांना माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते कपडे वाटप करण्यात आले. 

जळगाव जिल्हा  मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी ताई खडसे खेवलकर, महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष वंदना ताई चौधरी, किसान सेल जिल्हा अध्यक्ष सोपान पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ,प स सभापती सुवर्णा ताई साळुंखे,बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील,जिल्हा दूध संघ संचालक मधुकर राणे,जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, तालुका अध्यक्ष यु डी पाटील सर,निळकंठ चौधरी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिपक पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष पवन पाटील, सोशियल मीडिया जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील,माजी प स सभापती सुधाकर पाटील, राजु माळी, दशरथ कांडेलकर, विलास धायडे,किशोर चौधरी,युवक तालुकाध्यक्ष शाहिद खान, सचिन पाटील, महिला तालुका अध्यक्ष लता ताई सावकारे,जि प सदस्य निलेश पाटील,यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मनोगत व्यक्त करताना रोहिणी ताई खडसे खेवलकर म्हणाल्या, सुप्रिया ताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण कामगारांना कपडे वाटप करत आहोत. सुप्रियाताई सुळे या सक्षम लोकप्रतिनिधी असुन त्यांनी संसदेत केलेल्या चमकदार कामगिरी बद्दल त्यांना संसदरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी सुप्रिया ताई यांचे मोठे योगदान आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवती काँग्रेस मधुन नविन महिला नेतृत्व उदयास येत आहे.

आज सूतगिरणी सुरू होऊन पाच वर्षे झाले असुन येथे बहुतांशी महिला कामगार काम करत आहेत. भविष्यात सूतगिरणीचा विस्तार करून धागा ते कापड निर्मिती करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. यावेळी यु डी पाटील सर, ईश्वर रहाणे, वंदना ताई चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना एकनाथराव खडसे म्हणाले, चौदा वर्षांपूर्वी मुहूर्तमेढ रोवलेल्या सूतगिरणीचे कार्य पुढे नेऊन रोहिणी ताई खडसे यांनी सूतगिरणी सुरू करून दाखवली व स्व निखिल खडसे यांचे स्वप्न पूर्ण करून स्थानिक महिला युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आज सुप्रियाताई यांच्या वाढदिवसानिमित्त आपण येथील कामगारांना कपडे वाटप करत आहोत.

सुप्रियाताई या जनसेवेचे व्रत घेतलेल्या नेत्या आहेत.  त्यांच्या वागण्यात कोणताही बडेजाव नसतो. संसदेत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली असून स्त्री भ्रूण हत्येविरोधात त्यांचे मोठे कार्य आहे. त्यांनी महिला सक्षमीकरण करण्यासाठी केलेले कार्य प्रशंसनीय असुन सूतगिरणी मध्ये सुद्धा महिला काम करत आहेत. या महिला सुद्धा सक्षम झाल्या असुन रोहिणी ताई यांनी भविष्यात सूतगिरणीचा विस्तार केल्यास आणखी महिलांना रोजगार उपलब्ध होईल.

यावेळी  संदिप देशमुख, बापु ससाणे, निलेश शिरसाट, आसिफ बागवान, रामभाऊ पाटील, चंद्रकांत बढे,रघुनाथ पाटील, अतुल पाटील, प्रदिप साळुंखे, सुनिल काटे, सुनिल पाटील, विलास वानखेडे, विनोद काटे,राजेश ढोले, मुन्ना बोडे, प्रविण दामोदरे, रवींद्र पाटील, सुनिल पाटील ,विकास पाटील,वासुदेव बढे, विजय भंगाळे, प्रकाश साळुंखे, प्रेमचंद बढे, नंदकिशोर हिरोळे, राहुल युवराज पाटील सुभाष खाटीक, सोपान कांडेलकर, प्रभाकर सोनवणे, गजानन पाटील, चांगदेव सरपंच विशाल बोदडे, राजेंद्र पाटील, कैलास कोळी, राजेंद्र चौधरी, सोनु पाटील, चेतन राजपुत, अरुण गायकवाड, प्रदिप बडगुजर, रवींद्र खेवलकर, कल्पेश शर्मा उपस्थित होते.

यावेळी डी एम जगताप यांनी प्रास्ताविक, विलास धायडे यांनी सूत्रसंचालन तर रामभाऊ पाटील यांनी आभार मानले. पुरुषोत्तम बढे, सचिन पाटील ,नंदकिशोर बेलदार, पवन चौधरी, अजय अढायके,योगेश माळी, यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

 

Exit mobile version