Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मनसेच्या वर्धापन दिनाला जनतेला स्वस्त पेट्रोलचे वाटप !

यावल प्रतिनिधी । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनाचे औचीत्य साधून आज येथील मनसे शाखेतर्फे नागरिकांना स्वस्त पेट्रोलचे वाटप करण्यात आले.

तसेच टू व्हिलर वाहन धारकांनांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच आनंद व समाधान त्यांच्या चेहऱ्यावर बघण्यास मिळाले महाराष्ट्रनवनिर्माण सेनेच्या माध्यमातुन भविष्यात असे  खूप चांगले विधायक लोकहिताचे उपक्रम अधिक चांगल्या पद्धतीने या वर्षभरात राबवत आहे अशी अपेक्षा चेतन अढळकर मनसेचे ( जिल्हाध्यक्ष  जनहीत ) यांनी व्यक्त केले आहे . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रावेर लोकसभा जनहित जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर  यांच्या नेतृत्वाखाली शहरातील फैजपुरमार्गावरील शुभानी पेट्रोल पंप वरती दुचाकी वाहनधारकांना हा लाभ देण्यात आला त्या ठिकाणी उपस्थित मनसेचे पदाधिकारी तालुका उपाध्यक्ष श्याम पवार शहराध्यक्ष किशोर नन्नवरे विभागाध्यक्ष आबिद कच्ची, गौरव कोळी, विपुल येवले, सचिन बारी, अनिल सपकाळे ,कुणाल बारी ,गोविंदा अढळकर ,राहुल सुतार, ऋषिकेश कानडे ,रोहन धांडे हे प्रामुख्याने उपस्थित होते . कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी सुभानी पेट्रोल पंप वरील सर्व  कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले

Exit mobile version