Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नियाज अली भैय्या फॉउंडेशनतर्फे गरजू-गरीबांना ब्लॅंकेट व मास्क वाटप

जळगाव प्रतिनिधी । शहरातील सैय्यद नियाज अली फाऊंडेशनतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि थंडीपासून बचाव व्हावा यासाठी गरीब गरजूंना ब्लँकेट आणि मास्कचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम शहरातील रेल्वे स्टेशन, नवीन बसस्थानक, बी.जे.मार्केट परिसरात राबविण्यात आला. 

 

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.  तसेच हिवाळा सुरु झालेला असून गरीब, भीक्षा मागणारे भिक्षेकरी ज्यांना घरदार  नसून जे इकडे तिकडे रस्त्यावर झोपतात अशा दुर्लक्षित लोकांकडे थंडी व कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोणतेच साधन सामुग्री जसे ब्लँकेट व मास्क वगैरे नसतात.  यामुळे त्यांची प्रचंड गैरसोय होत असते. म्हणून मुस्लिम बांधवांचा पवित्र सणाच्या निमित्त शहरातील सैय्यद नियाज अली भैय्या फॉउंडेशनच्या वतीने  सोमवारी ३० नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील रेल्वे स्टेशन,  टॉवर चौक, नेहरू चौक,  जुने बस स्टँड,  नवीन बस स्टँड,  बी. जे. मार्केट परिसरातील रस्त्यांवर झोपणाऱ्या गरीब व दुर्लक्षित लोकांना थंडी व कोरोनापासून बचाव होण्यासाठी मोफत ब्लॅंकेट व  मास्क चे वाटप करण्यात आले.  याप्रसंगी दोनशे ब्लँकेट व मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी कोरोनाबाबत जनजागृती करण्यात आली.

 

याप्रसंगी सैय्यद अयाज अली नियाज अली, नाझीम पेंटर, शफी ठेकेदार, योगेश मराठे,  सुरज गुप्ता,  इलियास नूरी,  अमोल वाणी,  अशफाक नूरी,  सय्यद उमर,  शेख कुरबान,  हाशिम कुरेशी,  सय्यद ओवेश अली, सलमान शेख, सय्यद अता ए मोईन अली, सय्यद वकार, शेख  रिझवान, सय्यद यासिर अली, शेख शफिक आदी उपस्थित होते.

Exit mobile version