Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बुलढाणा जिल्हा प्रशासनातर्फे 1 हजार रेमडेसिवीरचे वितरण

बुलढाणा प्रतिनिधी । जिल्ह्यातील विविध रुग्णालयांना जिल्हा प्रशासनामार्फत दि.29 एप्रिल रोजी 1 हजार रेमडेसिवीरचे वितरण करण्यात आले आहे. अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी दिली.

दिनांक 29 एप्रिल रोजी रुग्णालयांना बेड व रूग्ण संख्येनुसार वितरण करण्यात आलेले रेमडेसिवीर याप्रमाणे – बुलडाणा : लद्धड हॉस्पीटल 39 इंजेक्शन, मेहत्रे हॉस्पीटल 35,रविदीप हार्ट केअर हॉस्पीटल 11, निकम हॉस्पीटल 10, जाधव पल्स हॉस्पीटल 13, सहयोग हॉस्पीटल 22, आशिर्वाद हॉस्पीटल 30, सिद्धीविनायक हॉस्पीटल 39, काटकर हॉस्पीटल 14, शिवसाई हॉस्पीटल 30, संचेती हॉस्पीटल 19, न्यु लाईफ कोविड हॉस्पीटल 1, सोळंकी हॉस्पीटल 7, सावजी हॉस्पीटल 14,  चिखली : योगीराज हॉस्पीटल 45, हेडगेवार हॉस्पीटल 39, गुरूकृपा हॉस्पीटल 16, तायडे हॉस्पीटल 31, दळवी हॉस्पीटल 24, पानगोळे हॉस्पीटल 20, खंडागळे हॉस्पीटल 15, गंगाई हॉस्पीटल 15, जैस्वाल हॉस्पीटल 16, मलकापूर : झंवर हॉस्पीटल 15, ऑक्सीजन कोविड केअर सेंटर 42, कोलते हॉस्पीटल 18, राईट केअर हॉस्पीटल 9,

आशिर्वाद हॉस्पीटल 11, नांदुरा : स्वामी समर्थ कोविड सेंटर 35, शेगांव : श्री गजानन कोविड हेल्थ केअर 23, सोळंके कोविड केअर हॉस्पीटल 19, शामसखा हॉस्पीटल 41,   खामगांव : चव्हाण हॉस्पीटल 9, अश्विनी नर्सिंग हॉस्पीटल 24, श्रीराम हॉस्पीटल 5, आईसाहेब मंगल कार्यालय कृष्णअर्पण 23, मेहकर : मातोश्री हॉस्पीटल 26, मापारी हॉस्पीटल 26, गिताई सुश्रूत हॉस्पीटल 15, गोविंद क्रिटीकल 13, श्री. गजानन हॉस्पीटल 35, अजंता हॉस्पीटल 6, मेहकर मल्टीस्पेशालीटी 26, दे. राजा : बालाजी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल 7, संत गाडगेबाबा हॉस्पीटल 20, मी अँड आई हॉस्पीटल 7,  सिं. राजा : जिजाऊ हॉस्पीटल 21, विवेकानंद हॉस्पीटल हिवरा आश्रम ता. मेहकर 5 असे एकूण 1000 रेमडिसिवीरचे वितरण करण्यात आले आहे.

जिल्ह्यास रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्राप्त झालेल्या साठ्यापैकी 10 टक्के राखीव साठा आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. सदर साठा फ्रंटलाईन वर्कर तथा डॉक्टर्स, इतर कर्मचारी वर्ग तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्याकरीता शासनाचे सुचनेप्रमाणे जिल्हाधिकारी यांचे आदेशान्वये राखीव ठेवण्यात आला आहे. सर्व संबंधित डॉक्टर्स व फार्मासिस्ट यांनी सदर औषधाचा वापर हा योग्यरित्या व अत्यावश्यक असलेल्या रूग्णांकरीताच प्राधान्याने वापरण्यात यावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण भुषण अहीरे यांनी कळविले आहे.

Exit mobile version