जि. प. सदस्य प्रतापराव पाटलांच्या प्रयत्नांनी जामोद येथील बस सेवा होणार पूर्ववत !

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील जामोदा येथील बससेवा रस्ता खराब झाल्याने बंद झाल्याची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी तात्काळ रस्ता दुरूस्तीचे काम मार्गी लावल्याने आता बस सुरू होणार असल्याने ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार आहे. 

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील जामोद येथे जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील हे द्वार दर्शनाला गेले असता ग्रामस्थांनी त्यांना बस सेवेच्या अभावी हाल होत असल्याचे सांगितले. गावातील व आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थांनी, सरपंच यांनी वेळोवेळी एसटी डेपोला पत्र दिले होते,  एसटी बस बंद असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. जास्त भाडे खर्च करून अवेळी धावणार्‍या खाजगी वाहतुकीचा आसरा घ्यावा लागत असल्याची तक्रार याप्रसंगी करण्यात आली.

प्रतापराव पाटील यांनी तात्काळ जळगाव एस.टी. डेपोच्या आगार प्रमुखांना फोन लाऊन माहिती जाणून घेतली. यावर त्यांनी जामोद येथील रस्त्याची खराब असल्याकारणाने बस येऊ शकत नाही असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. यासाठी पालक मंत्रीमहोदयांनी तत्काळ जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांना सूचना देऊन स्वखर्चाने जेसीबी व मुरूम उपलब्ध करून दिला असून याचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे.

रस्ता दुरूस्त झाल्यानंतर बंद एसटी सुद्धा लगेच सुरू करण्यात येईल अशी ग्वाही प्रतापराव पाटील यांनी दिली. याप्रसंगी जामोद गावाचे समाधान पाटील, गुलाबअण्णा भिमराव पाटील, दिलीप पाटील, शिवाजी पाटील, धनराज पाटील, पळसोदचे सरपंच पंकज पाटील, योगराज पाटील, आमोदाचे बाळु अहिरे, ईश्वर सुर्यवंशी, नाना पाटील, गाढोदाचे प्रविण पाटील, बाळु पाटील तात्या सिताराम पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Protected Content