Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

Rape Child crime

 

पुणे (वृत्तसंस्था) एका शिक्षकाने दहा वर्षीय विद्यार्थिनीला गृहपाठाचे कारण सांगून थांबवत विनयभंग केल्याची घटना पुण्यातील खडकीत उघडकीस आली. याप्रकरणी संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

आसिफ युसूफ शेख (४८, रा. खडकी ,पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आराेपी शिक्षकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकीत शेखचा खासगी शिकवणकी असून त्याठिकाणी तो विद्यार्थ्यांना विविध विषयाचे मार्गदर्शन करतो. मंगळवारी वर्ग सुटल्यानंतर त्याने एका १० वर्षीय मुलीला गृहपाठाचे कारण देउन थांबविले. सर्व विद्यार्थी निघून गेल्यानंतर शेखने संबंधित विद्यार्थीनीचा विनयभंग केला. पिडीत मुलीने घरी सांगितल्यानंतर तिच्या आईने खडकी पोलिस ठाण्यात आराेपी विराेधात फिर्याद दिली आहे.

Exit mobile version