Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पारोळ्यात लसीकरणाबाबत उद्भवणाऱ्या समस्यांवर अधिकाऱ्यांमध्ये चर्चा

पारोळा प्रतिनिधी । तहसिल कार्यालय येथे कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगाव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांच्या उपस्थितीत पारोळा तालुक्यात सुरू असलेल्या लसीकरणाबाबत उद्भवणाऱ्या समस्या व नागरीकांची होत असलेली गैरसोयबाबत विविध अधिकाऱ्यांनी चर्चा केली आहे.

यावेळी स्टाफ उपलब्ध होत नसल्याचे सुर्यवंशी यांनी सांगितले. त्यावर सभापती अमोल पाटील, मध्यस्ती करत पारोळा तालुका डॉक्टर असोसिएशन व नगरपरिषदेच्या सहकार्याने स्टाफ उपलब्ध करून देण्यात आला. तसेच लसिकरण केंद्र वाढवण्यासंदर्भात कृषि उत्पन्न बाजार समिती सहकार्य करणार असुन बाजार समिती आवारात लसिकरण केंद्र सुरू करा व नागरीकांची गैरसोय तातडीने दुर करा, अशा अमोल पाटील उपस्थित अधिकाऱ्यांना सुचना केल्या. यावर सुरू आहे. त्याच ठिकाणी अधिकचे कर्मचारी नेमुण लसीकरणाची गती वाढवण्यात येईल व आवश्यक तेव्हा बाजार समिती आवारात लसिकरण केंद्र सुरू करण्यात येईल असे एकमत झाले.यावेळी तहसिलदार अनिल गवांदे, तालुका वैद्यकीय अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, गटविकासअधिकारी विजय लोंढे, मुख्याधिकारी ज्योती भगत, पोलिस स्टेशन प्रतिनिधी निलेश गायकवाड यांची ही उपस्थितीत होती

Exit mobile version