Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महापौरांनी दिले मलनि:स्सारण योजनेच्या कामाचे कार्यदेश

20190821 175607

जळगाव, प्रतिनिधी | महापालिकेकडून निविदा राबविण्यात आलेल्या अमृत योजने अंतर्गत मलनि:स्सारण योजनेच्या कामाचे १६० रू. कोटी रकमेच्या कामाचे कार्यादेश महापौर सीमा भोळे यांचे हस्ते या योजनेचे कामी निविदा मंजूर केलेले मक्तेदार एल. सी. ईन्फ्रा प्रोजेक्टस प्रा लि,अहमदाबाद, गुजरात यांचे प्रतिनिधी निकेश नाकरानी यांना आज दिनांक २१ ऑगस्ट रोजी देण्यात आले.

याप्रसंगी सभापती स्थायी समिती जितेंद्र मराठे, सभापती महीला व बालकल्याण समिती मंगला चौधरी, उज्वला बेंडाळे, चेतन सनकत, स्थायी समिती सदस्य, शहर अभियंता सुनील भोळे, शाखा अभियंता प्रकल्प योगेश बोरोले उपस्थित होते. हे पुढील ३० महीन्यात पुर्ण करावयाचे असुन यात कानळदा रोडच्या आजू बाजूचा परीसर, इंद्रप्रस्थ नगर, एस के ऑईल मील, खडके चाळ, क्षत्रिय मराठा मंगल कार्यालय परीसर, महावीर जिनिंग फॅक्टरी, संभाजी चौक, अमर चौक उस्मानिया पार्क पर्यन्तचा शिवाजीनगरचा संपुर्ण परीसर, प्रजापत नगर, हरीओम नगर, मोहन थेटर परीसर, कांचन नगर, शनीपेठ, बालाजी पेठ, बळीराम पेठ, शंकरराव नगर, दशरथ नगर, ज्ञानदेव नगर, बहीणाबाई चौधरी जलकुंभ परीसर, संपुर्ण जुने जळगाव परीसर, कालीकामाता चौक परीसर, अजिंठा चौफुली, रॉयल फर्नीचर, मेहरूण परीसर, मेहरूण तलावाच्या आजूबाजूचा परीसर, मोहन नगर, आरटीओ ऑफीसचा रस्ता, काव्यरत्नावली चौक, आकाशवाणी चौक, स्वातंत्र चौक, कोर्ट चौक, रेल्वे स्टेशन या सीमेतील भागांचा समावेश आहे.

Exit mobile version