Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिनकर नगरातून २१ वर्षीय तरूण बेपत्ता; शनीपेठ पोलीसात हरविल्याची नोंद

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील आसोदा रोडवरील गायत्री नगरात राहणारा शुभम संजय पाटील हा २१ वर्षीय तरूण वेटर काम करून येतो असे आईला सांगून १३ मे पासून बेपत्ता झाला आहे. आईच्या खबरीवरून मंगळवारी सकाळी शनीपेठ पोलीसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. 

सविस्तर माहिती अशी की, आसोदा रोडवरील गायत्री नगरात राहणारा शुभम पाटील (वय-२१) हा आपल्या आईवडीलांसह राहातो. गुरूवारी १३ मे रोजी सकाळी ६ वाजता मी वेटरचे काम करून येतो असे आई प्रमिला पाटील यांना सांगून शुभम घराबाहेर पडला. सायंकाळी उशीरापर्यंत घरी आला नाही म्हणून आईवडील चिंतेत पडले. त्यांनी मित्र, नातेवाईकांशी संपर्क साधून मुलगा शुभम आला की नाही याची चौकशी केली.

दोन दिवसांनंतर अखेर आज मंगळवारी सकाळी शनीपेठ पोलीस ठाण्यात आई प्रमिलाबाई यांच्या खबरीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात हरविल्याची  नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक अमोल विसपूते करीत आहे. 

Exit mobile version