Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिगंबर महाराज मठात रंगला आषाढी कीर्तन सोहळा

kirtan

फैजपूर प्रतिनिधी । पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात लाखो वारकरी बांधवाची उपस्थितीत असते. त्याचप्रमाणे दिगंबर महाराज चिनावलकर यांचे मठात देखील सुमारे दोन हजार भाविक यावल व रावेरमधुन पोहचले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज मुक्ताई संस्थान पालखी सोहळ्याचे प्रमुख ह.भ.प.रवींद्र महाराज हरणे यांचे कीर्तन संपन्न झाले आहे. त्यांनी सांगितले की, मानवी जीवनाचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. यावर मार्गदर्शन करण्यात आले. त्याचा अंगीकार आपण करावा व जीवन सुखी बनवावे. याकार्यक्रमास ह.भ.प.विशाल खोले महाराज, ह.भ.प.नितीन अहिर महाराज, ह.भ.प.दुर्गादास नेहते महाराज, दिनकर पाटील महाराज, संस्था अध्यक्ष नरेन्द्र नारखेडे, उपाध्यक्ष घनश्याम पाटील, सचिव विठ्ठल भंगाळे, विजय ढाके, किशोर बोरॉले, विनायक गारसे, प्रमोद इंगळे, डिंगबर बऱ्हाटे, पंडित कोल्हे, माजी आ. शिरीष चौधरींची भेट पंढरपूर येथे दरवर्षी यात्रा महोत्सवात माजी आमदार शिरीष चौधरी हे भेट देत असतात. यावेळेस डिंगबर महाराज मठात भेट देऊन दिवसभर सर्व कार्यक्रमास सहभागी होऊन परमार्थ आनंद घेतला. मठात भागवत कथा सुरू असून ह.भ.प.दत्तात्रय महाराज गुरव कथा सांगत आहे. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विश्‍वस्थ मंडळांने परिश्रम घेत असून त्यांचे समवेत भास्कर इंगळे, जनार्दन भारंबे, नरेंद्र चौधरी, तुळशीराम धांडे, भगवान चौधरी, खानापूर यांनी ही जबाबदारी सांभाळत आहे.

Exit mobile version