Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिनेश पाटील यांचे निधन; आज अंत्ययात्रा

अमळनेर प्रतिनिधी । कावपिंप्रि हायस्कूलचे शिपाई दिनेश रघुनाथ पाटील (४०) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

दिनेश रघुनाथ पाटील यांचे काल रात्री नाशिक येथे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी दोन वाजता त्यांच्या गावी गडखांब ( तालुका अमळनेर) येथील राहत्या घरून दुपारी दोन वाजता निघणार आहे. ते मंगरूळ हायस्कूलचे भाऊसाहेब प्रवीण पाटील यांचे लहान बंधू होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या अकाली मृत्यूने शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

Exit mobile version