Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

“गण गण गणात बोते”च्या गजरात‎ निघाली अमळनेर ते शेगांव पायी दिंडी

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  श्री संत गजानन‎ महाराजांच्या दर्शनासाठी अमळनेर ते शेगांव पुरूषांची पायदळ दिंडी‎ गुरूवार २३ नोव्हेंबर रोजी निघाली. या दिंडीत अमळनेर शहरासह ग्रामीण भागातील २५० पेक्षा अधिक गजानन भक्त मोठ्या प्रमाणात सहभागी झाले‎. गण गण गणात बोते, टाळ मृदुंग‎, विना व अभंगांच्या गजरात संपूर्ण‎ वातावरण भक्तिमय झाले होते.‎

अमळनेर ते शेगांव पायी वारीचे ११ वे वर्षे आहे. ही पायी वारी गुरूवारी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी निघाली. तर मंगळवारी २८ नोव्हेंबर पर्यंत शेगावला पोहचणार आहेत. गुरूवारी २३ रोजी सकाळी  सात वाजता गजानन महाराज मंदिर दादासाहेब जी.एम.सोनार नगर अमळनेर येथून पायीवारीची सुरुवात झाली. त्या अगोदर ५ वाजता मंगळ ग्रह संस्थांनचे अध्यक्ष व जेष्ठ पत्रकार डिगंबर महाले यांच्या हस्ते सहपत्निक महाआरती करण्यात आली.

यावेळी गजानन महाराज सेवा संस्थानचे अध्यक्ष प्रा.राजेंद्र पवार, ज्योती पवार, सेवेकरी रघूनाथ पाटील, अशोक भावे  उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवानिवृत्त प्राचार्य एल.जे चौधरी यांनी केले. सकाळी गजानन महाराज मंदिरात आरतीसाठी ग्रामीण व शहरातील सर्व महीला भगिनी व बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. वारीचे स्वागत काँलनीतील महीला भगिनीं यांनी रांगोळी काढत केले.पुर्ण शहरातील परीसर गजानन महाराज यांच्या जयघोषात परिसर दुमदुमला, पायीवारी तील दिंडी यात्रेतील पालखीचे गजानन भक्तांनी दर्शन घेतले.

ठिकठिकाणी स्वागत

अमळनेर ते शेगांव पायीवारी दादासाहेब जी. एम.सोनार नगर येथून सुरुवात झाल्यानंतर ठीक ठिकाणी विद्याविहार कॉलनी, मुकेश ज्वेलर्स ,आर के ज्वेलर्स ,वाडी मध्ये दर्शन नंतर दिलीप पाटील पैलाड, किरण पाटील भिलालीकर यांच्याकडून अल्पोपहार, सती माता येथे केळी वाटप ,गोपाल कुंभारकडून  फळे वाटप ,अरुण साळुंखे यांच्याकडून दुपारचा फराळ दिला. यावेळी पायीवारीचे ठिकठिकाणी स्वागत गजानन भक्तांनी केले.

पायीवारीत लागणारा औषध पुरवठा मोफत

साई सेवा हॉस्पिटल संचालक डॉ प्रशांत शिंदे अमळनेर यांच्याकडून संपूर्ण वारीत लागणारा औषध पुरवठा मोफत दिला तर डॉ जिजाबराव पाटील यांच्याकडून वारीतील गजानन भक्तांना मोफत वैद्यकीय सेवा दिली जाणार आहे. पाण्याची व्यवस्था श्री गजानन ग्रुप करणखेडा यांनी केली आहे.

ठिकठिकाणी पायीवारीच्या गजानन भक्तांची व्यवस्था

२३ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर २०२३ अमळनेर ते शेगाव पायीवारीचे नियोजन आहे. यासाठी वारीतील भाविकांसाठी सकाळचा नाश्ता,दुपारचे जेवन,चहा,रात्रीचा मुक्काम व जेवन,पाण्याची व्यवस्था, व वारीला लागणारा औषध पुरवठा, वैद्यकीय सेवा अनेक गजानन भक्त  यांनी सेवा दिली आहे असे वारी प्रमुख आर.बी.पवार सर महीला वारी प्रमुख सौ ज्योती पवार , प्रवीण पवार साहेबराव पाटील, श्रीकृष्ण चव्हाण, पांडुरंग कोळी, मनोहर पाटील ,मोहित पवार ,मखमल पाटील ,अनिल भालेराव, अशोक पाटील, सुनील पाटील सात्री, एल.जे चौधरी, जनार्दन पाटील मारवड, प्रमोद पवार खापरखेडा, डॉ जिजाबराव पाटील कावप्रिपी, कैलास पवार खेडी, सुनील पवार, रामप्यारी भैय्या अमळगाव ,चंद्रकांत पाटील ,साहेबराव पाटील, कपूरचंद पाटील करणखेडा, महादेव कोळी करणखेडा, प्रमोद अहिरराव बोहरा, प्रभाकर पवार भाटपुरा, नारायण धनगर चांदसर ,अनिल भालेराव, कृष्णा पाटील तांबेपुरा, अरुण पाटील तामसवाडी, प्रीतम रत्नपारखी करणखेडा अमोल पाटील इंधवा,ह.भ.प.दत्तात्रय पाटील करणखेडा परिसरातील भाविक मोठ्या संख्येने पायवारी मध्ये शेगांवकडे रवाना झाले.

Exit mobile version